
सोशल मीडियावर कलेचे एकापेक्षा एक सरस आविष्कार सातत्याने दिसत राहतात. हे आविष्कार बघून थक्क व्हायला होतं. अशाच एका कलाकृतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो बघून कलावंतांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. ही कलाकृती चमचे, काटे वापरून तयार केली आहे. चमचे वापरून चिमणीची प्रतिकृती करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चमचे (स्पून सेट) वापरण्यात आले आहेत. चिमणीची चोच, पंख, डोळे अगदी पायदेखील स्टीलच्या चमच्यांपासून बनवले आहेत. ही अनोखी चिमणी आकाशात उडू शकत नाही. मात्र कलाकाराच्या अद्भुत कारागिरीची सफर नक्कीच घडवू शकते. हा फोटो सोशल मीडियावर नेटकऱयांचे मन जिंकत आहे.




























































