
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे निमित्त साधत राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक अहिल्यानगर जिह्यातील जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षेत्र चौंडी येथे उद्या होणार आहे. या विशेष मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चौंडी आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.
600 व्हीव्हीआयपी, दोन हजार विशेष पाहुणे
बैठकीला 600 व्हीव्हीआयपी व दोन हजार विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी लगबग सुरू आहे.
‘जर्मन हँगर’ प्रकारचा मंडप
265 फूट लांब व 132 फूट रुंद असा ‘जर्मन हँगर’ प्रकारचा एसी मंडप उभारला आहे. त्यात साडेतीन हजार खुर्च्या, ग्रीन रूम्स असेल. जेवणात पुरणपोळी, शिपी आमटी, मासवडी, शेंगोळे, पुलाव, कुरडई, थालीपीठ, खवापोळी, कोथिंबीरवडी, हुरडा थालीपीठ, वांग्याचे भरीत, दालबट्टी, मटकी, मसाला वांगे, स्पेशल शिंगोरी आमटी, दही-धपाटे, आमरस-चपाती, म्हैसूर बौंडा, मांडे असा बेत असणार आहे.