
गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर सेवेबद्दल पोलीस उपनिरिक्षक स्वरूपा सुंदर नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा मेडल जाहीर करण्यात आले आहे. पोलीस उपनिरिक्षक स्वरूपा सुंदर संगीता नाईकवाडे यांनी जून 2022 मध्ये पीएसआयची ट्रेनिंग पुर्ण केली. त्यानंतर त्यांना प्रथम नेमणूक गडचिरोली येथे देण्यात आली. एक महिना गडचिरोली येथे परत नक्षल विरोधी मोहिमेत काम करण्यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली
एक महिन्यानंतर त्यांना धानोरा येथील पोलीस ठाणे येथे नेमणूक देण्यात आली. वर्ष 2022 ते 2025 या तीन वर्षात स्वरूपा नाईकवाडे यांनी अनेक मोहीमेत सहभाग घेतला. अतिदुर्गम भागात त्यांनी चांगले काम केले. तेथील आदिवासी भागातील नागरिकांची उत्तम सेवा केली. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आदिवासी भागात पोहचवल्या. तरुणाईला शासकीय निमशासकीय सेवेत नौकरीच्या खूप संधी आहेत. त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन शिबिरात कार्य केले. पॉक्सो अंतर्गत अनेक गुन्ह्यात त्यांनी मुलींना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्या कामी त्यांना पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रही देण्यात आले.
या तीन वर्षातील त्याच्या चांगल्या कामाबद्दल पोलीस उपनिरिक्षक स्वरूपा नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पोलिस विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. तीन वर्षाच्या छोट्या कालावधीत हे पदक त्यांना मिळाल्याबद्दल स्वरूपा नाईकवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.