
स्पाईस जेट एअरलाइन्सने जवळपास 80 वैमानिकांना तीन महिन्यांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. गेल्या चार वर्षांपासून स्पाईस जेटला मोठय़ा तोटय़ाची झळ बसली आहे. ही पंपनी सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) 27 जुलैच्या आदेशाचे पालन करून 50 टक्क्यांहून कमी उड्डाणे चालवत आहे. पंपनीने बी-737 विमानाच्या 40 आणि क्यू-400 विमानाच्या 40 वैमानिकांना तीन महिने विनापगारी रजेवर पाठवले आहे. वाढत्या तोटय़ात खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.


























































