बापरे! माणसाच्या कानात घुसून कोळ्याने जाळं विणलं

97

सामना ऑनलाईन, दालिआन

झोपते वेळी कानामध्ये डोळ बडवल्यासारखे आवाज येत असल्याने एका ६० वर्षांच्या माणसाने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. कान,नाक,घसा तज्ञ कुई शुलिन यांनी या व्यक्तीचा कान तपासायला घेतला तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसला.

त्यांनी कानामध्ये सोडलेल्या एका अतिसूक्ष्म कॅमेऱ्यामध्ये कोळ्याने जाळं विणल्याचं दिसून आलं. सोबतच त्यांना एक लहान कोळीही दिसून आला. हा कोळी कानात गेला कसा हे मात्र रुग्णाला नीट सांगता आलेलं नाहीये. डॉक्टरांनी कान साफ केल्यानंतर आणि कोळी मारल्यानंतर आपल्याला होणारा त्रास आता बंद झाल्याचंही या रुग्णाने सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या