
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे माणसे जिथे घरी आहेत. तिथेच अनेक वन्य प्राणी रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसत आहेत. अशातच एक खारुताईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या खारीला पाहून ती कपालभारती करत असल्या सारखे दिसत आहे.
Kapalbhati aasana….squirrel style. pic.twitter.com/Tdgx9vDRHS
— SAKET (@Saket_Badola) May 12, 2020
साकेत नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने लिहिलं आहे की, ‘कपालभारती आसन, खार स्टाईल’. या व्हिडीओमध्ये एक खार बसलेली दिसत आहे. ती बसून श्वास आत बाहेर घेताना दिसते. जेव्हा ती श्वास आत बाहेर करते, तेव्हा ती कपालभारती करत असल्याचे भासते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांना ही खारूताई आवडताना दिसत आहे.




























































