श्रीलंका अंधारात; सहा तासांहून अधिक वेळ देशात वीज नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंका येथील केरावलपिटीया येथील पॉवर स्टेशनच्या ट्रान्समिशनमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण श्रीलंका शहरात सोमवारी दिवसभरासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण शहर अंधरात गेले होते. परिणामी देशातील दैनंदिन व्यवहार आणि जनजीवन ठप्प झाल्याने प्रशासनाला मोठा फटका बसला आहे. तर अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा देखील बोजवरा उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले.

श्रीलंका येथील केरावलपिटीया येथील पॉवर स्टेशनमध्ये आज बिघाड झाल्याने संपूर्ण शहरात अंधार पसरला होता. दुपारपर्यंत शहरात सर्वत्र वीजपुरवठा खंडीत झाला होता. जवळपास सहा तासानंतर शहरातील काही ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. केरावलपिटीया येथील पॉवर स्टेशनमधील ट्रान्समिशनमध्ये बिघाड झाल्याने हा वीज पुरवठा गेल्याचे, द सायक्लॉन इलेक्ट्रिसिटी बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्याने कोलंबो शहरातील सिग्नल यंत्रणा देखील बंद झाली होती. त्यामुळे याठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला होता.