श्रीलंकन नौदलाकडून 3 हजार हिंदुस्थानी मच्छीमारांची हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । चेन्नई 

श्रीलंकन नौदलाने त्यांच्या हद्दीत मासेमारी केल्याप्रकरणी तीन हजारहून अधिक हिंदुस्थानी मच्छीमारांना हाकलवून लावले आहे. त्यांच्यावर दगडफेक करून त्यांच्या जाळ्याही जप्त केल्या आहेत. सर्व मच्छीमार हे तमिळनाडूचे रहिवासी असल्याची माहिती मच्छीमार संघटनेच्या नेत्यांनी दिली.

रामेश्वर मच्छीमार संघटानेचे अध्यक्ष पी.सेसुराजा म्हणाले की, “रामेश्वर आणि मंडपम भागातील मच्छीमार बुधवारी 7000 नौका घेऊन सोमवारी गेले होते. तेव्हा कच्चातीवू द्वीपजवळ मासे पकडताना श्रीलंकन नौदलाच्या सैनिकांनी त्यांना हटकले. त्यांना धमकावले तसेच 50 नौकांमधील मासेमरीचे जाळही जप्त केले. त्यानंतर सर्व मच्छीमारांना तिथून हाकलवून लावले.” सर्व मच्छीमार मोकळ्या हाताने परतल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्ष सेसुराजा यांनी केंद्राकडे याबाबत हस्तक्षेप करण्याचे आवान केले आहे. मासेमारीबाबत 1974 साली हिंदूस्थान आणि श्रीलंकेत एक करार झाला होता त्यानुसार हिंदुस्थानी मच्छीमारांना कच्चातीवू द्वीप भागात मासेमारी करण्याची मुभा होती. श्रीलंकेच्या नौदलाने नेदुंतीवू तटावर मासेमारी केल्याप्रकरणी मंगळवारी एकूण 17 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक केली आहे.