
कश्मीर खोऱयातील हिमवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरून होणारी सर्व विमान वाहतूक आज रद्द करण्यात आली होती. शनिवारी रात्रीपासूनच हिमवृष्टी सुरू होती. पहाटे थोडा वेळ थांबलेल्या या हिमवृष्टीने नंतर पुन्हा जोर पकडल्यावर खराब हवामानामुळे सर्व विमान वाहतूक दिवसभरासाठी रद्दच करण्यात आली. इंडिगोनेही मुंबईहून श्रीनगरकडे होणारी 4 उड्डाणे आणि लेहकडे जाणारी दोन उड्डाणे रद्द केली.

























































