
हाकेला धावणाऱ्या नांदगाव येथील जागृत देवस्थान श्रीदेव कोळंबा देवाची जत्रा सालाबादप्रमाणे मुंबई येथे रविवार 18 जुलै रोजी साजरी होणार आहे. या वर्षी होणारी 89 वी जत्रा असून कोरोना विषाणूमुळे फक्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा नियमांचे पालन करून संपन्न होणार आहे. या सोहळय़ाचे हजारो कोळंबा भक्तांना ई-मीडियाद्वारे थेट प्रक्षेपण यूटय़ूब व फेसबुकवर पाहता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर आणि सेक्रेटरी राजेंद्र मोरये यांनी दिली.































































