
मंदिरामधील चोरीचे सत्र काही थांबायला तयार नाही. आता शहरातील संभवनाथ जैन श्वेतंबर मंदिराचे सुमारे 2 लाख 26 हजार 250 रुपयाचे बांधकाम साहित्याची चोरी झाले आहे. मंदिराचे ट्रस्टी अमित गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मंदिराचे सध्या जिर्नोध्दाराचे काम चालु आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी मंदिरात दर्शनसाठी गेलो असता मंदिराच्या जिर्नोध्दारासाठी काढुन ठेवलेले सहा पितळी ग्रिल्स दिसले नाही. आजुबाजुला चौकशी केली, परंतु 4 पितळी ग्रिल्स, इलेक्ट्रॉनिक मोटार दिसली नाही. तेथील पुजाऱ्याने 18 डिसेंबरला दोन पितळी ग्रिल्स व सात पितळी झाळ्या अंदाजे 150 ते 175 किलो वजानाच्या 2 लाख 26 हजार 250 रुपयांचे ऐवज चोरीला, अशी फिर्याद गांधी यांनी दिली आहे.
या घटनेनंतर संभवनाथ जैन श्वेतंबर मंदिराचे ट्रस्टी शैलेश बाबरिया, अमित गांधी, सुमतीलाल शहा, अजित नगरकर,पत्रकार अनिल पांडे, ललीत कोठारी यांच्यासह जैन बांधव जमा झाले.पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांची भेट घेतली. या प्रकरणी आय.पी.एस आयुश नोपाणी तपास करीत आहे.

























































