डोंगरीत एसआरपीएफ काँन्स्टेबलची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआरपीएफच्या जवानाने एसएलआर रायफलने स्वत:च्या मानेखाली गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी डोंगरी येथे घडली. पुष्कर शिंदे (36) असे त्यांचे नाव होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र त्यांनी कौटुंबिक कलहातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

पुष्कर शिंदे हे एसआरपीएफ गट नं. 2 पुणे, प्लाटुन नं. 1 मध्ये कार्यरत होते. मंत्रालय मेन गेट येथे बंदोबस्तासाठी असलेल्या स्ट्रायकिंग क्र. 3 मध्ये ते होते. सोमवारी रात्रपाळी केल्यानंतर मंगळवारी सकाळी प्लाटून डोंगरी येथील पालिका शाळेत नाँर्ममलला आले होते. शिंदे यांना सकाळी 8 ते 10 यावेळेत गाडीवर गार्डसाठी तैनात होते. दरम्यान 9.50 च्या सुमारास मोबाईलवर बोलत असताना शिंदे यांनी एसएलआर रायफलने मानेखाली गोळी मारून घेतली.

बसमध्ये चढण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवरच त्यांनी गोळी झाडून घेतली. अचानक आलेल्या गोळीच्या आवाजानंतर त्यांचे सहकारी धावत बसजवळ आले. तेव्हा शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन दिवसांपूर्वी शिंदे सुट्टीवरून कामावर हजर झाले होते. त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले ते समजू शकलेले नाही. शिंदे यांनी आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहली नव्हती. मुळचे रत्नागिरीचे असलेले शिंदे सध्या पुण्यात वास्तव्यास होते. शिंदे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.डोंगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.