दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च 2020 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढ दिली आहे. निवडणूक, दिवाळीची सुट्टी त्यामुळे बहुसंख्य शाळांमधून अद्याप दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शिक्षण मंडळाने नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

www.mahahsscboard. maharashtra.gov.in आणि www.mahasscboard.in या वेबसाइटवर अर्ज करायचा आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी दिली.