
सामना प्रतिनिधी । मुंबई
बारावीचा निकाल लागल्यापासून दहावीच्या निकालाची प्रतिक्षा सुरू झाली होती. निकाल आज लागणार उद्या येणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली सोशल मीडियावर तारखा पडू लागल्यामुळे अनेकजण बुचकाळ्यात पडले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 8 जूनला लागणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सर्व चर्चेला पूर्णविराम मिळला आहे. तसेच 11 जून रोजी 12 वी बोर्डाच्या गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2019 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षा निकाल 8 जूनला दुपारी 1 वाजता लावणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

































































