
सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे कला विषयातील वाढीव गुणांचे प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 20 मार्च, सायंकाळी 5 वाजेपर्यंत शाळांकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येतील. ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत कोटय़ातील वाढीव गुणांसाठी प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.दहावीच्या विद्यार्थ्यांना कला विषयाचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ शास्त्र्ााrय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱया विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. यासाठी प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी 8 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती





























































