एसटीच्या सवलतींचा दोन कोटींहून अधिक प्रवाशांना फायदा

670
st bus
फाईल फोटो

मागील पाच वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे. यात अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्वातंत्र्यसैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवाशी भाडय़ात सवलतीचा  समावेश आहे.

ग्रामीण भागातील मुलींची महाविद्यालयीन शिक्षणातील गळती रोखण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत मोफत प्रवास सवलत देण्यात येत आहे. या योजनेत दहावीपर्यंत 19 लाख 54 हजार लाख विद्यार्थिनी तसेच बारावीपर्यंत 24 लाख विद्यार्थिनी लाभ घेत आहेत. विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा एसटी प्रवास सवलत योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सवलत 66. 67 टक्के आहे. सध्या या योजनेचे 44 लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे 50 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.

दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र ते निवासस्थान यादरम्यान प्रवासासाठी 66 . 67 टक्के सवलत देण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येईल.

रुग्णांना सवलती

क्षयरोग व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सिकलसेलग्रस्त, हिमोफिलीया आणि एचआयव्हीबाधित रुग्णांना 100 टक्के प्रवास सवलत देण्यात येते. 100 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या सहकाऱ्यास

50 टक्के प्रवास सवलत होती. आता रेल्वेप्रमाणे 65 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. वातानुकूलित शिवशाही बसमध्ये दिव्यांग आणि त्यांच्या सहकाऱ्यालाही प्रवास भाडे सवलत देण्यात येते.

 

आपली प्रतिक्रिया द्या