लाल परी पुन्हा रस्त्यावर, ग्रीनझोन असल्याने जिह्यात धावली पहिली बस

1258

लॉकडाऊनमुळे मागील 50 दिवसापासून बंद असलेली लाल परी आजपासून प्रवासांच्या सेवेसाठी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. धाराशिव जिल्हा हा ग्रीनझोन मध्ये असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कांही अटी व शर्तीच्या आधीन राहून जिल्हाअंतर्गत बससेवेस परवानगी देण्यात आली आहे.

राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे 22 मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक प्रवाशी वाहतूकीमध्ये महत्वाची असलेली लाल परी म्हणजेच बससेवा बंद करण्यात आली होती. धाराशिव जिह्यात महामंडळाचे दररोज सुमारे 50 लाख रुपयाचे नुकसान होत होते.

यादरम्यान केंद्र सरकारकडून कोरोना रुग्णांच्या संख्येच्या आधारे देशातील विविध जिह्याचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. धाराशिव जिह्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याने धाराशिव जिह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश झाला असून या पार्श्वभुमीवर नागरीकांना कांही प्रमाणात लॉकडाऊनमधून सवलत देण्यात आली आहे. याच अंतर्गत कांही अटी व नियम घालून जिल्हा प्रशासनाकडून बस वाहतूक सेवेस परवानगी देण्यात आली आहे.

आज धाराशिव बसस्थानाकडून आज सकाळी आठ वाजता धाराशिव – उमरगा ही लॉकडाऊन दरम्यान राज्यातील पहिली बस धावली आहे. धाराशिव जिह्यातील 6 आगारातून आज 11 बस फेऱया होणार आहेत. या बसमधील चालकांना महामंडळाकडून मास्क, सॅनीटायझर किट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच सध्या बसमध्ये प्रवास करणाऱया प्रवाशांची सर्व माहिती मंडळाकडून संकलीत करण्यात येणार आहे. सध्या या बसमध्ये प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के म्हणजे केवळ 22 प्रवाशी घेतले जाणार असून यामध्येही वयस्कर, वृध्द, आजारी नागरीक, गरोदर महिला तसेच लहान मुलांना प्रवेश देण्यात येणार नाही.

दरम्यान, काल बसस्थानकाची स्वच्छता करण्यात आली होती तसेच ज्या बसेस धावणार आहेत त्या बसचेही निर्रजंतुकीकरण करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या