
प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या प्रश्नावर राज्यभरातील एसटी कामगारांच्या विविध संघटनांनी सोमवारी धरणे आंदोलन सुरु केले. त्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे लक्षात येताच महायुती सरकार हादरले आणि एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये तसेच वेतनवाढीचा फरक देणार असल्याची घोषणा केली. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेले एसटी कामगारांना दिवाळीत दिलासा मिळाला आहे.
एसटीच्या सुमारे 85 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटना आणि कृती समितीच्या बैठकीत सरकारने जाहिर केला.