कोणत्याही आमिषाला बळी पडू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

गेली चार वर्षे एसटी महामंडळ अतिशय पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवीत असून कोणताही बाह्य हस्तक्षेप खपवून घेतला जात नाही. उमेदवारांना भरती प्रक्रियेबद्दल काही शंका अथवा तक्रार असल्यास सबळ पुराव्याच्या आधारे 18001218414 या निःशुल्क टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसटीतर्फे करण्यात येत आहे.

राज्यात 24 फेब्रुवारी रोजी चालक तथा वाहक पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रिया सुरू असून यापैकी पात्र उमेदवारांना संगणक परीक्षेसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा व संगणक परीक्षा यांच्या संयुक्त गुणतालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 17, 18, 19 मे रोजी विविध वर्ग 1 व 2 च्या अधिकारी पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे.