आतापर्यंत 16 लाख लोकांना एसटीचे ‘स्मार्टकार्ड’

572

एसटीचे आधारकार्डशी संलग्न असलेले ‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली असली तरी हे कार्ड मिळविताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. राज्यात आतापर्यत केवळ 16 लाख 83 हजार 471 जणांना ‘स्मार्ट कार्ड’चे वाटप झाले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 15 लाखांवर आहे.

 विविध सामाजिक घटकांना एसटीच्या प्रवासाची सवलत मिळत असते. परंतु एसटीच्या या सवलतीचा गैरवापर होत असल्याने नवीन आधारकार्डशी संलग्न असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेची अलिकडेच सुरुवात करण्यात आली. महामंडळाकडून सध्या विभाग, डेपो आणि महामंडळाने निवडलेल्या अधिकृत एजंटद्वारे ‘स्मार्ट कार्ड’ वाटप करण्यात येत आहे.

राज्यभरातील प्रत्येक आगारामध्ये स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी केवळ एकच संगणकप्रणाली उपलब्ध करून देण्यात आल्याने स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांना रांगा लावाव्या लागत आहेत. महामंडळाने ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचे कंत्राट ट्रायमॅक्स कंपनीला दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या