मुलुंडमध्ये फार्मसी नोंदणीदरम्यान चेंगराचेंगरी,४ जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुलुंडमधील महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या (फार्मसी) कार्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरीची झाली आहे. या चेंगराचेंगरीत चार जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अनिकेत श्रृंगारे ( ३०) असं या तरुणाचे नाव असून त्याला मुलुंडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी देखल केले आहे.

मुलुंड पश्चिमेला असलेल्या महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या कार्यालयात आज सकाळपासूनच ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या मुलांची मोठी गर्दी झाली होती. विनानगर येथील आर स्वेअर या पॉश इमारतीत हे कार्यालय आहे. सकाळी सकाळी दहाच्या सुमारास कार्यालयाबाहेर मुलं रांगेत असताना अचानक जोरादार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पावसापासून आपली कागदपत्रे वाचवण्यासाठी मोठी पळापळ सुरु झाली आणि यातूनच चेंगराचेंगरी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनिकेत श्रृंगारेहा मुलगा खाली पडला आणि त्याच्या अंगावरून काही जण गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात, मात्र यासाठी कुठल्याहीप्रकारचे नियोजन नसल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे. घटनास्थळी मुलुंड पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सूरू आहे.