अभिनेता रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेल्या '83' या चित्रपटातील संपूर्ण टिमचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. हे सर्व फोटो रणवीर सिंगच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने शेअर केले आहेत.
या चित्रपटात रणवीर सिंग माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.
गोलंदाज किर्ती आझादची भूमिका साकारणार दिनकर शर्मा
गायक हार्डी संधु हे मदनलालच्या भूमिकेत दिसणार आहेत
रॉजर बिन्नीची भूमिका निशांत दहिया हा अभिनेता करणार.
संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटीलच करत आहे.
अभिनेता धैर्य करवा क्रिकेटपटु रवी शास्त्री यांची भूमिका साकारत आहे.
लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांच्या भूमिकेत अभिनेता ताहिर राज भसिन दिसणार आहे.
मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे याचा लूक अगदी दिलीप वेंगसरकर यांच्या तरुणपणीची आठवण करून देतोय.
अभिनेता साहिल खट्टर या चित्रपटात खेळाडू सय्यद किरमानी यांची भूमिका साकारत आहे.
बलविंदर सिंह संधू यांच्या भूमिकेसाठी पंजाबी गायक एमी विर्क यांची वर्णी लागली आहे.
83 च्या विश्वचषकाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका अभिनेता साकिब सलीम साकारणार आहेत.
दक्षिणेकडील अभिनेता जीवा या चित्रपटात श्रीकांत यांची भूमिका साकारत आहे.
प्रसिद्ध वेबसिरीज सेक्रेड गेम्समधील बंटी म्हणजे अभिनेता जतिन सरना या चित्रपटात यशपाल शर्मा यांची भूमिका साकारत आहे.