छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची आत्महत्या, आमीर खानसोबत केले होते काम

1999

अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येला काही दिवसच लोटले असताना छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. स्टार प्लसवरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ य़ा मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्माने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. सेजलने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तिचा मृतदेह तिच्या मीरारोड येथील फ्लॅटमध्ये आढळून आला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.


View this post on Instagram

Happy 2020 Pic credits : @casaurabhpatwari

A post shared by Sejal Sharma (@i_sejalsharmaofficial) on

दिल तो हॅप्पी है जी या मालिकेत सेजलने मुख्य अभिनेता अंशच्या दत्तक बहिणीची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने व्हिवो फोनच्या जाहिरातीत आमीर खानसोबत व उषा फॅनच्या जाहिरातीत रोहित शऱ्मा व हार्दिक पांड्यासोबत काम केले होते. तिने आजाद परिंदे नावच्या एका वेबसिरीजमध्येही काम केले आहे. या व्यतिरिक्तही अनेक जाहिरांतीच्या तिच्याकडे ऑफर्स होत्या. त्यामुळे इंडस्ट्रीत काम न मिळणं हे तिच्या आत्महत्येचं कारण असू शकत नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या