
स्टेट बँक ऑफ इंडियाला इन्कम टॅक्स विभागाकडून तब्बल 6 हजार 338 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. एसबीआयने ही माहिती दिली आहे. आयकर विभागाने ही नोटीस एसबीआयला आर्थिक वर्ष 2023-24 साठी दिली आहे. एसबीआयला दिलेल्या या नोटिसीमध्ये व्याजही जोडलेले आहे. एसबीआयला इन्कम टॅक्स अॅक्ट सेक्शन 143(3), 144 सी (3), आणि 144 (बी) अंतर्गत ही नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसीचा कोणताही परिणाम बिझनेसवर पडणार नाही, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.


























































