
या वर्षी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम बुधवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. किशोर गटाच्या कबड्डी स्पर्धा 5 ते 8 मार्च या कालावधीत जळगावला, पुमारांच्या 16 ते 19 मार्च या कालावधीत सांगलीत तर पुरुष व महिला (खुल्या) गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 1 ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत सिन्नर (नाशिक)येथे होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुषंगाने चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे या वर्षी स्पर्धा लांबल्या होत्या. शासनाच्या निर्णयानंतर याबाबत कार्यकारिणीची बैठक होऊन हे निर्णय घेण्यात आले.




























































