
राज्य निवडणूक आयोग मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मुदतवाढ दिली असून 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.
या पत्रकार परिषदेबाबत निवडणूक आयोगाने पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे मंगळवारी १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत या निवडणुकांबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




























































