राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा, 20 ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप

539

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू कराकी, वेतनत्रुटीचे तातडीने निवारण करावे, सर्क रिक्त पदे कायमस्करूपी त्करीत भरावीत, केंद्राप्रमाणे वाहतूक, शैक्षणिक आणि हॉस्टेल भत्ता लागू करावा, सेवानिवृत्तीचे वय विनाअट 60 वर्ष करावे, पाच दिवसांचा आठवडा, महिला कर्मचार्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर करावी, अनुकंपा भरती विनाअट तत्काळ सुरू करावी आदी मागण्यांसाठी संप करण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या