राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षा रविवारी

285

महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षा रविवार, 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पंच परीक्षा उजळणीवर्ग शनिवारी (24 ऑगस्ट) सकाळी 9 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 2017-18 पर्यंत जिल्हास्तर पंच परीक्षा पास झालेले परीक्षार्थी अर्ज करू शकतात. ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या पंच परीक्षेतील परीक्षार्थींना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. ज्या परीक्षार्थींना परीक्षा द्यायची आहे त्यांनी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच मंडळाचे अध्यक्ष संदीप पायगुडे (मो. क्र. 9860177019) आणि सदस्य अनिल यादव (8208281388 / 9860541045) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य मधुकर नलावडे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या