
बालदिनाचे औचित्य साधून एन.टी.पी.सी. पश्चिम क्षेत्र-1 मुख्यालयाने ‘ऊर्जा’ विषयावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापीठात ही स्पर्धा रंगली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सुमारे 1500 कलाकृती आल्या होत्या. त्यातून 110 विजेत्या विद्यार्थ्यांना बालदिनी प्रत्यक्ष चित्र रंगविण्याच्या स्पर्धेसाठी बोलवण्यात आले होते. पाचवी ते सातवी वर्गाच्या गटात शुभ्रा सावंतला प्रथम पारितोषिक तर निर्वाण गुप्ता याला द्वितीय आणि यशवी रणसिंग हिला तृतीय पारितोषिक मिळाले. वर्ग 8 ते 10 गटात पहिले पारितोषिक अनुष्का कुलकर्णी, तेजस्वी गावडे (द्वितीय), खुशी चौकेकर (तृतीय) यांना मिळाले.
ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते सहभागी आणि पारितोषिक प्राप्त बाल चित्रकारांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या वेळी एनटीपीसी- अणुऊर्जाचे मुख्य महाप्रबंधक अर्नदा प्रसाद सामल, राज्य चित्र व शिल्प विभागाच्या आरती श्रावस्ती, ज्येष्ठ चित्रकार डॉ. गजानन सीताराम शेपाळ, प्रयोगशील चित्रकार अमोल पवार, अधिव्याख्याता प्रा. अक्षय पै, एनटीपीसीच्या क्षेत्रीय मानव संसाधन प्रमुख वंदना चतुर्वेदी आदी उपस्थित होते.




























































