
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
बृहन महाराष्ट्र योग परिषद अंतर्गत ३७ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धा १४ ऑक्टोंबर रोजी स्थानिक महेश भवन येथे थाटात संपन्न झाल्या. या स्पर्धेत नागपूरच्या सर्वाधिक २० खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर पुणे द्वितीय व ठाणे संघाने तिसऱ्या स्थानावर बाजी मारली.
स्पर्धेत राज्यभरातील विविध २७ जिल्ह्यातील ५०० च्या जवळपास खेळाडुंनी सहभाग दर्शविला. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, नगरसंघचालक दामोधर लखाणी, ठाणेदार राजेश बनकर, पतंजली योगपीठ समन्वयक हरिभाऊ पाटील, व्यापारी संघाचे अशोक राजदेव, पत्रकार सागर कुटे, सतिष दांडगे, प्रा. डॉ. एच. ए. भोसले, नितीन पोटे, व्हि. के. मघाडे, राज्य संघटनेचे सरकार्यवाह अर्जुन खोडसकर, स्पर्धा प्रमुख सतिष मोहगावकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. आर. उपर्वट, सचिव तेजराव डहाके तसेच स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन भुजबळ, सचिव विजय पळसकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील म्हणाले की, स्पोर्टस् झोन ऑफ मलकापूरच्या व बुलढाणा जिल्हा योग असोशिएशन यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे जिल्ह्यात योगासन क्रीडा प्रकाराचा प्रचार, प्रसार व विस्तार होतांना पहायला मिळतो आहे.
या स्पर्धेत मुली ८ ते १३ वयोगटात प्रथम श्रावणी आनंद गोलानी नागपूर, द्वितीय मृणाली मोहन बानाईत नागपूर, तृतीय रक्षीता श्रीराम राघुते नागपूर, मुलांमधून ओम आशिषकुमार कोल्हे नागपूर, नितेश नरेश मोरे रत्नागिरी, श्रृमल मोहन बानाईत नागपूर, मुली १३ ते १८ वयोगटात सुमानी भाऊराव गिरीपुंजे नागपूर, रिध्दी क्रांतीकुमार बचीम रत्नागिरी, साक्षी दादाराव काटे नागपूर, मुलांमधून वैभव वामन श्रीरामे नागपूर, हर्षल विलास चुटे नागपूर, ऋषिकेश बापुसो माने कोल्हापूर, मुली १८ ते २५ वयोगटात कल्याणी विलास चुटे नागपूर, शिवाणी वैभव नागवाडे पुणे, पुर्वा अरुण मिरे नागपूर, मुलांमधून वैभव विजय टेंम्बे ठाणे, शुभम गौतम वंजारी नागपूर, घननील दादाराव लोंढे कोल्हापूर, मुली २५ ते ३५ वयोगटातून पुजा गोपाल बावीस्कर नाशिक, मृणल युवराज बाराई नागपूर, वर्षा आदित्य जुवेकर ठाणे, मुलांमधून प्रथम गणेश मधुकरराव ढोले यवतमाळ, द्वितीय चिरंतन सुधीर तपकिरे सोलापूर, तृतीय हनुमंत बापु भोरे ठाणे, मुली ३५ ते ५० वयोगटातून प्रथम योगिता निलेश क्षिरसागर नागपूर, द्वितीय दिव्या नितीन भुजवानी गोंदिया, तृतीय चेतना एस. लिहारे गोंदिया, मुलांमधून प्रमोद किसनराव कळमकर गोंदिया, विनोद रामचंद्र नितोने बुलडाणा, सुहास पांडुरंग बदंबे ठाणे, मुली ५० ते ६० वयोगाटातून प्रथम सुजाता मल्लेश इमजे पुणे, द्वितीय संगिता राजन नासता मुंबई सिटी, तृतीय राधिका श्रीकृष्ण काटेकर ठाणे, मुलांमधून प्रथम रमेश बाळु मंडवकर पुणे, द्वितीय दत्तराम राजाराम सावंत मुंबई सिटी, तृतीय लक्ष्मण डी. चव्हाण गोंदिया यांनी पटकाविला. या विजयी खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निखिल गलवाडे, विवेक जाधव, लोकेश शर्मा, श्रेयस शिंदे, मंगलसिंग सोळंके, संजय वुडुकले, रत्नपारखी, गैरी सोळंके, गौरी बुडुकले यांचेसह स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे विशेष सहकार्य लाभले.

































































