मुंब्र्याचा ताबा राज्य राखीव दलाने घेतला

5855
प्रातनिधिक फोटो

कोरोनाच्या संकटामुळे लॉक डाऊन जाहीर करूनही मुंब्र्यातील अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याने अखेर आज राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडी तैनात करण्यात आल्या. या तुकडीतील सशस्त्र जवान मुंब्रा तसेच दिव्यातील संवेदनशील भागात गस्त घालणार आहेत.

वारंवार सांगूनही मुंब्र्यातील अनेक नागरिक विशेषतः तरुण कारण नसताना रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांनी अनेकदा विनंती करूनही मुंब्रावासीय ऐकत नसल्याने नवी मुंबई येथून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडी दाखल करण्यात आल्या आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामात आणखी मदत होईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.

कठोर कारवाई करणार

गरजे शिवाय जे नागरिक विनाकारण घरा बाहेर पडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. आज दाखल झालेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीत शंभर जवान आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या