“चीटर गो बॅक”, इंग्लंडच्या क्रिकेट शौकिनांकडून स्मिथ-वॉर्नरची हुर्यो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

शनिवारी यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सराव सामना झाला. या लढतीदरम्यान इंग्लंडच्या क्रिकेटशौकिनांनी आयसीसीच्या बंदीनंतर पुन्हा कांगारूंच्या संघात परतलेले स्टिव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर मैदानात उतरल्यावर “चीटर, चीटर, चीटर”, “चीटर गो बॅक” अशा घोषणा देत या दोघांची जोरदार हुर्यो उडवली.

#WorldCup2019 – यजमानांना धक्का, मार्क वूडला दुखापत; कर्णधारही अनफीट
वर्ल्डकप इतिहासाची सफर – 1983 मध्ये हिंदुस्थान ठरला ‘जायंट किलर’

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर लादलेल्या एक वर्षांच्या बंदीनंतर या दोन्ही खेळाडूंचे नुकतेच ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले. शनिवारच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याच्यासमवेत दुसरा सलामीवीर म्हणून वॉर्नर जेव्हा मैदानावर दाखल झाला, त्यावेळी एका प्रेक्षकाने ‘फसवेगिरी करणारा वॉर्नर तू बाहेर निघ’ अशा स्वरूपाची घोषणा दिली. तसेच वॉर्नर मैदानावर येताच तोंडातून आवाज काढत प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली. त्यानंतर दोन गडी बाद झाल्यानंतर स्मिथ जेव्हा खेळायला आला, त्यावेळी त्यालादेखील ’चीट, चीट, चीट’ करून चिडवण्यात आले. स्मिथने प्रथम 50 आणि नंतर 100 धावा केल्यानंतरही काही प्रेक्षकांनी आवाज काढत त्याची चेष्टा केली.

Photo : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारे 5 फलंदाज