वर्ल्डकप इतिहासाची सफर – 1983 मध्ये हिंदुस्थान ठरला ‘जायंट किलर’

16


सामना ऑनलाईन । मुंबई

पहिल्या दोन वर्ल्डकपमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी 1983 पासून नवीन युगाची सुरुवात झाली. 1975 आणि 1979 मध्ये पहिल्या फेरीचा अडथळाही पार न करू शकलेला हिंदुस्थानचा संघ 1983 च्या वर्ल्डकपमध्ये जायंट किलर ठरला. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात दिग्गज वेस्ट इंडीजला पराभवाचा धक्का दिला आणि तिसऱ्या विश्वचषकावर नाव कोरले. हिंदुस्थानच्या विजयामुळे सलग तिसरा वर्ल्डकप जिंकून ‘हॅटट्रिक’ करण्याची वेस्ट इंडीजची स्वपन उद्ध्वस्त झाली.

#ICCWorldCup इतिहासाची सफर – कसा होता पहिला वर्ल्डकप?
Photo : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणार 5 फलंदाज

1983 च्या वर्ल्डकपमध्ये आठ संघ सहबागी झाले होते आणि त्यांची ‘अ’ आणि ‘ब’ गटामध्ये विभागणी करण्यात आली. ‘अ’ गटामध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ‘ब’ वेस्ट इंडीज, हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, झिंबाब्वे या संघांचा समावेश होता. ‘अ’ गटामधून इंग्लंड आणि पाकिस्तान उपांत्य तर गट ‘ब’ मधून वेस्ट इंडीज आणि हिंदुस्थान उपांत्य फेरीमध्ये पोहोचले. उपांत्य फेरीत हिंदुस्थानने इंग्लंडवर 6 विकेटने विजय मिळवला, तर वेस्ट इंडीजने पाकिस्तानवर 8 विकेटने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

#ICCWorldCup इतिहासाची सफर – विंडीज सलग दुसऱ्यांचा विश्वविजेता
#ICCWorldCup क्रिकेट इतिहासात पहिल्या त्रिशतकीय भागिदारीचा मान हिंदुस्थानी जोडीला

नाट्यमय फायनल सामना
25 जून 1983 रोजी अंतिम सामना हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीजमध्ये रंगला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. वेस्ट इंडीजच्या धारधार गोलंदाजीसमोर हिंदुस्थानचा संघ अवघ्या 183 धावांमध्ये बाद झाला. हिंदुस्थानने दिलेले माफक आव्हान वेस्ट इंडीजची तगडी फलंदाजी पार करून तिसरा विश्वचषक उंचावणार असा चाहत्यांचा अंदाज होता. परंतु क्रिकेट हा अनिश्विततेचा खेळ आहे हे लोक विसरले. हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला भगदाड पाडले आणि सामना हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला. अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी तीन बळी घेत हिंदुस्थानला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. हिंदुस्थानने अंतिम सामना 43 धावांनी जिंकत पहिल्या वर्ल्डकपवर नाव कोरले.

#ICCWorldCup वर्ल्डकपमधील हिंदुस्थानच्या नावावरील अचाट विक्रम

वर्ल्डकपमधील ठळक घडामोडी –

– प्राथमिक फेरीमध्ये हिंदुस्थआनने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा 34 धावांनी पराभव केला तर अंतिम सामन्यात 43 धावांनी पराभव केला, केवळ उलट्या आकड्यांचा खेळ.

– कपिलदेवने उप-उपांत्य सामन्यामध्ये झिंबाब्वेविरुद्ध 138 चेडूंमध्ये 175 धावा केल्या. त्यामध्ये 16 चौकार आणि 6 षट्कारांचा समावेश होता.

– अंतिम सामन्यात रिचर्डस् यांनी टोलवलेला चेंडू कपिलदेवने 18-20 यार्ड पाठीमागे पठत जाऊन झेलला.

आपली प्रतिक्रिया द्या