‘वंदे भारत’ पुन्हा लक्ष्य; उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे ट्रेनवर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vande-bharat

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे रविवारी ‘वंदे भारत’ ट्रेनवर दगडफेक करण्यात आली आणि डब्याच्या खिडकीचा चक्काचूर झाला. ही ट्रेन गोरखपूरहून लखनौला जात होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली. बाराबंकी येथील सफेदाबाद रेल्वे स्थानकाजवळ सकाळी ही घटना घडली. 10.40 वाजता ट्रेन लखनौला पोहोचली. बाराबंकीच्या रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तपास सुरू केला.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) एस्कॉर्ट टीमने नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या निरीक्षकांना घटनास्थळी कोणतेही साक्षीदार आढळले नाहीत. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक झालेली नाही.

सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या महिन्यात अयोध्येत वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती.