कोल्हापुरात वादळी वाऱ्याने झाड ऊन्मळले, हातकणंगले वडगांव वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ख्यातील हातकणंगले परिसरात सोसाट्याचा वारा, व वळवाच्या पावसाने आज  दुपारी हजरी लावली त्यामुळे  वडगांव हातकणंगले रोडवरती आळते जवळ  मोठे झाड पडल्याने काही काळ रस्ता बंद झाला त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच आळते येथील कै.बाळासाहेब पाटील हायस्कूल या शैक्षणिक संस्थेच्या शेडचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे परिसरात विस्कूटन पडून मोठे नुकसान झाले. मोठ्या वादळी वाऱ्यासह वळवाच्या  पावसाने सुरवात झाल्याने आळते व परिसरात मोठे नुकसान झाले.

आळते येथे हातकणंगले -वडगांव रस्त्यावरती मोठे झाड पडल्याने काही काळ वाहनांच्या रांगा रस्त्यावर उभ्या होत्या. या वाहनांना  आळते गावातून मार्ग सुरू केल्याने वाहनांच्या रांगा कमी झाल्या. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कै. बाळासाहेब  पाटील या शिक्षण संस्थेचे पत्र्याचे शेड पूर्ण उडाल्याने मोठे नुकसान झाले. वेगाचा वाऱ्यामुळे अनेक झाडे, फांद्या वीजवाहिनीवर पडल्यामूळे काही काळ या परिसरात विद्युत पुरवठा बंद होता. फांद्या आणि पडलेली झाडे दूर करण्याचे काम अद्याप सुरू आहे.