
समुद्री कासवांच्या स्थलांतरीत हालचालींचा मागोवा घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांतर्गत मंडणगड तालुक्यातील वेळास किनाऱ्यावर मंगळवारी ‘ऑलिव्ह रिडले’ जातीच्या पाच कासवांच्या पाठीवर उपग्रह टॅग करून त्यांना समुद्रात सोडण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे टॅगिंग करण्यात आले.





























































