पबजीच्या भुताने पछाडले; विद्यार्थ्याने घरच सोडले

577
pubg-new

पबजी गेमचे भूत डोक्यावर बसलेल्या  एका विद्यार्थ्याला आई-वडील ओरडले म्हणून तो थेट घरातून पळून गेल्याची घटना नवी मुंबईत घडली. आयुष चुडाजी (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. गेल्या आठवडाभरापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार चुडाजी कुटुंबीयांनी पोलिसांत नोंदवली आहे.

आयुष चुडाजी हा नवी मुंबईमधील नेरुळ येथील सावली सदन या सोसायटीत राहतो. आयुषला पबजी खेळण्याचे वेड लागले होते. रात्री आई-वडील झोपले की त्यांचा मोबाईल घेऊन त्यावर रात्रभर तो पबजी खेळत असे. दिवसा कॉलेजला न जाता तो सायबर कॅफेमध्ये फक्त पबजीच खेळण्यात अख्खा दिवस वाया घालवत असतो. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून कॉलेजलाच जात नसल्याचे  उघड झाल्यानंतर त्याचे आई-वडील त्याला ओरडले आणि पबजी खेळण्यास मनाई केली. त्याचा राग आयुषला आला आणि तो घरातून पळून गेला. आयुषचे वडील ठाण्यातील एका खासगी कंपनीत काम करतात, तर आई वाशी येथे एका कंपनीत नोकरी करते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या