शिकवणी मास्तराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅण्टॉप हिल परिसरात खासगी शिकवणी घेणाऱया एका मास्तराचे कृष्णकृत्य समोर आले आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अंगचटीला जात तिचा विभयभंग करणाऱया त्या मास्तराला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलगी शीव परिसरात राहते आणि अॅण्टॉप हिल येथे खासगी शिकवणीला जाते. अभ्यास शिकविण्याच्या बहाण्याने मास्तर मुलीच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता, पण मास्तराचे अश्लील कृत्य दिवसागणिक वाढूच लागल्याने विद्यार्थिनीने या त्रासाला वैतागून शिकवणीला जाणे बंद केले. शेवटी या अन्यायाबाबत मुलीने घरच्यांपुढे वाच्यता केल्यावर खासगी शिकवणीच्या मास्तराचे अश्लील कृत्य चव्हाटय़ावर आले. मुलीच्या पालकाने लगेच अॅण्टॉप हिल पोलीस ठाणे गाठून मास्तराविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगचा गुन्हा दाखल करून त्या विकृत मास्तराला बेडय़ा ठोकल्या.

चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार
चार वर्षांच्या मुलीवर 24 वर्षांच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वडाळा टी. टी. परिसरात घडला. मुलीने तिच्यासोबत घडलेले कृत्य पालकांना सांगितल्यावर त्यांनी वडाळा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल करून त्या विकृत तरुणाला अटक केली.