ऑनलाइन क्लास चुकविण्यासाठी विद्यार्थ्याची अनोखी शक्कल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात जगभरातील शाळा ऑनलाईन सुरू आहेत. शाळा म्हटलं की अभ्यास हा आलाच. ऑनलाईन क्लासदरम्यान अभ्यास नको म्हणून एका विद्यार्थ्याने लढवलेली शक्कल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाच्या आयडियाची कल्पनेबद्दल ऐकून अनेकांनी त्याला जीनियस असे म्हटले आहे.

क्रिस अरनॉल्ड नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरून याबाबतचा किस्सा शेअर केला आहे. क्रिस यांनी लिहिलंय, माझी पत्नी शिक्षिका असून सध्या ती ऑनलाईन क्लास घेत आहे. या दरम्यान एका विद्यार्थ्याने जे केले ते पाहून ती हैराण झाली आहे.

ऑनलाईन क्लासदरम्यान अभ्यास टाळण्यासाठी या विद्यार्थ्याने झूम क्रीनचे नाव स्वतःच्या नावाऐवजी चक्क ‘रिकनेक्टिंग…’ असे ठेवले. जेणेकरून त्याला कोणताही प्रश्न विचारला जाऊ नये. पुढे ते म्हणाले, जवळपास आठवडाभर हा प्रकार सुरू होता. पत्नीला वाटले की स्क्रीनमध्ये काहीतरी गडबड आहे. पण सत्य समोर आल्यावर ती देखील हैराण झाली. सोशल मीडियात त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांच्या मजेशीर कमेंट्स वाचायला मिळत आहेत.