प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीने मैत्रिणीच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंगणे येथे घडली. याप्रकरणी प्रियकरावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक्षा प्रकाश कोळेश्वर (वय 19, रा. एकता कॉलनी, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मयुल (रा. हिंगोली) (पूर्ण नाव व पत्ता नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश कोळेश्वर (वय 54, रा. तरोडा खुर्द, नांदेड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा आणि मयुल हे यांची ओळख हिंगोली येथे झाल्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. प्रतीक्षा ही शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर कोथरूड येथे एका हॉस्टेलवर ती राहत होती. तिच्यात आणि मयुलमध्ये वाद सुरू झाल्यानंतर त्याने तिचे फोटो घरच्यांना दाखवून, त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तिला वारंवार फोनवर बोलून, तसेच वॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून वाद घालत, तिला भेटायला आल्यावरही त्याने भांडण केले. गेल्या काही काळापासून ती नैराश्याखाली होती. 17 ऑगस्ट रोजी ती हिंगण खुर्द येथील मैत्रिणीकडे राहायला आली होती. तिची मैत्रिण काही वेळासाठी बाहेर गेली असता, तिने दुपारी दीडच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढली तपास सहायक निरीक्षक ज्योती गडकरी करत आहेत