श्रीरामपुरात ‘मेडिकल’च्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱया तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूरमधील अशोकनगर परिसरात घडली आहे. दरम्यान, या तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अक्षय अनिल पावसे (वय 25, मूळ रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे.

अशोकनगर परिसरात एका एक्सप्रेस रेल्वेखाली तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाची लवकर ओळख पटू शकली नव्हती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे आणला असता, त्याची ओळख पटली. अक्षय तालुक्यातील उक्कलगाव येथील राहणारा असून, सध्या तो कांदा मार्केट परिसरात राहत होता. तो मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील अनिल पावसे यांची लॅब आहे. मात्र, अक्षयने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या