आरटीईद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नववीत शाळेतून काढता येणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आठवीनंतर पुढे नववीत गेल्यावर शाळेतून काढता येणार नाही, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे खासगी शाळांतून आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर नववीत गेल्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळा नाहक त्रास देतात. सरकारने त्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्ती रक्कम न दिल्याने अनेक शाळा अशा विद्यार्थ्यांना नववीला प्रवेश देताना अडचणी आणतात, दाखला हातात देतात किंवा वाढीव शुल्क आकारणी करतात. अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे.