वीर्य आणि मूत्राने भरलेला केक शिक्षिकेला खाऊ घातला, विद्यार्थ्यांना शिक्षा

3847

लहानपणी अनेकांनी आपल्या शिक्षकांच्या कधी ना कधीतरी खोड्या काढल्या आहेत. पण, दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वीर्य आणि मूत्राने भरलेले केक खाऊ घालण्याचं किळसवाणं कृत्य केलं आहे. हे कृत्य उघड होताच या विद्यार्थ्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली असून 100 तासांची श्रमदानाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही अल्पवयीन विद्यार्थी ओहियो येथील ओलेन्टँजी मिडल स्कूलचे विद्यार्थी आहेत. या शाळेत पाककला स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेचं परीक्षण शाळेच्या शिक्षिका करणार होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याने केकवर वीर्याने भरलेलं आयसिंग केलं होतं. तर दुसऱ्या विद्यार्थ्याने केकमध्ये मूत्र मिसळलं होतं. स्पर्धा पार पडली, तेव्हा केक चाखून पाहिल्यानंतर शिक्षिकेला काहीही लक्षात आलं नाही. पण काही दिवसांनी या घटनेचा खुलासा झाला.

जेव्हा ही मुलं पाककृती तयार करत होती, तेव्हा काही मुलांनी त्याचं चित्रीकरणही केलं होतं. ते चित्रीकरण व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांची ही किळसवाणी कृत्यं समजली. हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं तेव्हा त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपापली कृत्यं मान्य केली. यूट्युबवरील एका व्हिडीओमुळे वीर्य मिसळण्याची कल्पना सुचल्याचं यांपैकी एका विद्यार्थ्यांने सांगितलं. कोर्टाने या दोन्ही विद्यार्थ्यांना 30 दिवसांसाठी बालसुधार गृहात राहण्याची शिक्षा सुनावली, तसंच 100 तास श्रमदान करण्याचा दंडही ठोठावला.

दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेतूनही निलंबित करण्यात आलं असून या घटनेनंतर या शिक्षिकेला मानसिक धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांचं अशा प्रकारचं कृत्य धक्कादायक असून त्यांनी हा त्रास देण्यासाठी माझीच निवड का केली, असा प्रश्नही तिला पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या