
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानात परत आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने खूप उशीर केल्याची संतप्त भावना सर्वत्र व्यक्त होत आहे हे आज पुन्हा स्पष्ट झाले. ‘जीव मुठीत धरून आम्ही युव्रेनच्या सीमेबाहेर पडलो. केंद्र सरकारने वेळीच पावले उचलली असती तर प्रचंड हाल झाले नसते. आता मायदेशी परतल्यावर गुलाबाचे फूल देऊन आमचे कसले स्वागत करताय?’ असा खडा सवाल विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला केला आहे.
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे विमानतळावर गुलाब फूल देऊन स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची चढाओढ दिसत आहे. देशातील वेगवेगळय़ा विमानतळांवर हे मंत्री पोहचत आहेत. या ‘चमकोगिरी’वर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
युक्रेन व रशिया युद्धाचा आठवा दिवस
जिवाची पर्वा असेल तर रशियन सैन्याने माघारी जावे! – वोलोदिमीर झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष, युक्रेन
आमचे ध्येय साध्य होईपर्यंत युद्ध सुरूच ठेवणार! व्लादीमीर पुतीन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
रशियाने सात दिवसांत 1 लाख 6 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर ताबा मिळवला आहे.
युक्रेनमधील चेर्निहाइव्हमध्ये रशियाच्या हल्ल्यात 22 नागरिक ठार झाले असून त्यात दोन फुटबॉलपटूंचाही समावेश आहे.
रशियाने आपल्या अंतराळ यानावरून अमेरिका, जपान आणि ब्रिटनचे राष्ट्रध्वज हटवले, मात्र हिंदुस्थानचा तिरंगा कायम ठेवला आहे.






























































