सुभाषिणी – मध्यमव्यायोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ऋतुजा फडके

भासाच्या नाटकांची नाटय़प्रणाली ही इतर नाटकांपेक्षा भिन> आहे. पात्रांचे कलात्मक चित्रण ही भासाच्या नाटकांचं प्रमुख वैशिष्टय़. भासाने रौद्र आणि कीर रसात बांधलेलं एक अंकी, क्यायोग या नाटय़ प्रकारात मोडणारं नाटक म्हणजे मध्यमक्यायोग.

लिखित स्करूपात ज्याची नाटकं उपलब्ध आहेत असा अग्रगामी नाटककार म्हणजे भास. भासाच्या नाटकांची नाटय़प्रणाली ही इतर नाटकांपेक्षा भिन्न आहे. पात्रांचे कलात्मक चित्रण ही भासाची हातोटी आहे आणि हे कर्णन करताना दैकी आयुधांचं मानकी चित्रण हे भासाचं आणखीन एक कैशिष्टय़. या सगळ्या लेखनशैली एकत्र करून रौद्र आणि कीर रसात भासाने बांधलेलं एक अंकी, क्यायोग या नाटय़ प्रकारात मोडणारं नाटक म्हणजे मध्यमक्यायोग. मागच्या लेखात या नाटकाची तोंडओळख आपण करून घेतली होती आता रौद्र आणि कीर रस या नाटकात, भूमिकांमधून, पात्र चित्रणातून आपल्याला कसा दिसून येतो ते पाहू.

ब्राह्मण, ब्राह्मणी आणि घटोत्कच यांचे आवाज ऐकून भीमाला त्याच्या व्यायामामध्ये व्यत्यय येतो. भीम ‘‘कोण माझ्या व्यायामामध्ये विघ्न आणून सारखं ‘मध्यम’, ‘मध्यम’ म्हणून ओरडतो आहे’’ असं म्हणतो आणि बाहेर येतो. बाहेर येऊन तो पहिल्यांदा घटोत्कचाला पाहतो आणि म्हणतो,

सिंहास्यः सिंहदंष्ट्रो मधुनिभनयनः स्निग्धगम्भीरकण्ठो
बभ्रुभूः श्येननासो द्विरदपत्रिहनुर्दीप्त विश्लिष्टकेशः
व्युढोरो वज्रमध्यो गजवृषभगतिर्लम्बपीनांसबाहुः
सुव्यत्तं राक्षसीजो विपुलबलयुतो लोकवीरस्य पुत्रः

(अरे, हा सिंहासारखे मुख असलेला आणि त्याच्याच सारखे भयानक दात असणारा, लाल डोळे असणारा, देखणा आणि उन्नत कंठ असणारा, पिंगल ललाट असणारा, श्येनासम नासिका असणारा, हत्तीसमान हनुवटी असणारा, लांब विस्कटलेले केस असणारा, पुष्ट वक्षस्थल असणारा, वृषभासमान चाल, लांब खांदे तसेच बलशाली बाहू असणारा नक्कीच कुठल्यातरी राक्षसीचा पुत्र किंवा वीरपुत्र असला पाहिजे.)

इकडे घटोत्कच भीमाला पाहूनसुद्धा ‘‘सिंहासारखे वदन असणारा, विशाल नेत्र असणारा, गरुडासारखा पार्श्वभाग असणारा, साक्षात भगवान विष्णूंचा बंधू वाटणारा त्याच्या नेत्रांनी मला आकृष्ट करत आहे’’ असे म्हणतो.

हे श्लोक इथे उद्धृत करण्याचे कारण की, इथूनच वीररसाची नाटकात सुरुवात आहे असं मला वाटतं. एकमेकांची रूपं पाहून दोघांनाही त्यांच्यातला वीररस युद्ध करण्यासाठी उद्युक्त करतो आहे. भासाच्या लिखाणाचीही शैली पहा. त्यानेसुद्धा लगेच त्यांच्यातल्या लढाईला सुरुवात नाही केली, त्याआधी वातावरण निर्मिती केली आहे. दृश्य साधनांमध्ये एखादं गाणं किंवा गाण्याचा भाग टाकला की, आपोआप वातावरण निर्मिती होते. शब्दांनी ती निर्मिती करणं कठीण आणि ही भासाची शैली.

दोघांची अशा प्रकारची नजरानजर झाल्यावर भीम कितीतरी वेळा घटोत्कचाला त्या निरपराध ब्राह्मणाला सोड असे सांगतो, पण घटोत्कचाला सहजासहजी ब्राह्मणाला हातचे जाऊ द्यायचं नाही. घटोत्कच म्हणतो, ‘‘एकवेळ माझ्या वडिलांनी मला सोड असं सांगितलं असतं तर मी सोडलं असतं; पण आईची आज्ञा शिरसावंद्य.’’ भीमसुद्धा आईवरची एवढी श्रद्धा पाहून थक्क होतो. शेवटी घटोत्कच मी तुम्हालाच घेऊन जातो असं म्हणतो. भीम म्हणाला, ‘‘मी असा कुणाच्या मागून येत नसतो. तुला मला घेऊन बलपूर्वक जावं लागेल. त्यालाही घटोत्कच तयार होतो.’’

“आता तुम्ही भयाच्या अधीन व्हा’’ असं घटोत्कच सांगतो खरं, पण त्याला ‘‘मी आजपर्यंत भयाचे नावदेखील ऐकले नाही, पण आज मी तुझ्याकडून या भयाबद्दल जाणू इच्छितो.’’ भीम लढाईला आमंत्रण देतो.

“शस्त्र ग्रहण करा’’ अशी आज्ञा केली.
यावर भीम उत्तरला,
काञ्चनस्तम्भसदृशो रिपूणां निग्रहे रतः ।
अयं तु दक्षिणो बाहुरायुधं सदृशं मम

(सोन्याच्या खांबाप्रमाणे शत्रूंच्या विनाशासाठी नेहमी तत्पर असणारा माझा दक्षिण बाहू (उजवा हात) हेच माझे शस्त्र आहे.)

हे ऐकून लगेच घटोत्कच ‘‘हे माझा पिता भीमासारखे आहे’’ असं म्हणतो. इथे भीमाला हा आपलाच मुलगा असल्याची खात्री पटते आणि भीम मुद्दाम ‘भीम’ नावाचे खरेच कुणी गृहस्थ आहेत का?’’ असं विचारतो. यावर घटोत्कचचा राग अनावर होतो आणि घटोत्कच
– कथम् ? कथम् अनृतमित्याह । क्षिपसि मे गुरुम् । भवतु, इमं स्थूलं वृक्षमुत्पाटय प्रहरामि । (उत्पाटय प्रहरति) कथमनेनापि न शक्यते हन्तुम् । किनु खलु करिष्ये । भवतु, दृष्टम् । एतद् गिरिकूटमुत्पाटय प्रहरामि । शैलकूटं मयाक्षिप्तं प्राणानादाय यास्यति।

(‘‘ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र यांच्यासमान असणाऱया माझ्या पूज्य वडिलांची तू अशी निंदा करतोस ? थांब, आता मी हा महाकाय वृक्ष उचलून तुझ्यावर फेकतो.’’ घटोत्कच तसे करतो. ‘‘काय, यानेसुद्धा तुला काही इजा झाली नाही? थांब, हा पर्वतच उखडून तुझ्यावर टाकतो. हे पर्वतशिखर नक्कीच तुझ्या प्राणांचे हरण करेल’’). त्यानेही काही होईना हे बघून दोघांमध्ये वायुयुद्धास आरंभ होतो. त्यानेसुद्धा काही होत नाही म्हटल्यावर घटोत्कच मंत्रोपचार करून त्याला मायापाशात अडकवतो. भीमसुद्धा मंत्रोपचार करून स्वतःला मायापाशातून मुक्त करतो. असं करत करत एकमेकांवर घात, आघात करत, हरत, जिंकत दोघेही हिडिंबेच्या दारात पोचतात. हिडिंबेचा हेतू सफल होतो. पिता-पुत्रांची भेट होते. वीर, रौद्ररस गळून पडून भावनांचा, प्रेमाचा विजय होतो व पडदा पडतो आणि भास ‘संस्कृत नाटय़सृष्टीचा खऱया अर्थाने शिल्पकार’ ठरतो.

[email protected]