सुब्रमण्यम स्वामींची अक्षयकुमारला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 राज्यसभेचे माजी खासदार, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार, अभिनेत्री जॅकलीन फर्नाडिस व ’राम सेतू’ चित्रपटाच्या निर्मात्यासह इतरांना कायदेशीर नोटीस बजावली. ’राम सेतू’ चित्रपटामध्ये चुकीचे दृश्य दाखवण्यात आले आहे. याला सर्वस्वी अक्षयकुमार व त्याची टीम जबाबदार आहे. बॉलीवूडवाले खोटे बोलतात, असा दावा स्वामींनी केला आहे.