आता ‘स्वयंपाका’वर अनुदान मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली,

आतापर्यंत केवळ एलपीजीधारकांनाच गॅस सबसिडी मिळते. मात्र, आता फक्त ‘एलपीजी’साठी नाही तर स्वयंपाकासाठी सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे यात एलपीजीसह पीएनजी (पाईन नॅचरल गॅस) आणि जैव इंधनाचा वापर करणार्‍या प्रत्येकाला सबसिडी मिळणार आहे.  निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी याबाबतची  माहिती दिली. जेवण बनवण्यासाठी ज्या ज्या इंधनांचा वापर केला जातो त्या सगळ्यांसाठी स्वयंपाक सबसिडी दिली जाणार आहे. आयात शुल्कावरून अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा हिंदुस्थानवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारकडून केवळ एलपीजीधारकांनाच सबसिडी दिली जात असल्यामुळे पीएनजी आणि ग्रामीण भागांतील जैव इंधनाचा वापर करणारे नाराज होते.

  • २०३०च्या राष्ट्रीय ऊर्जा धोरणात हे बदल केले जाणार आहेत.
  • गेल्या वर्षी याचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळ यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेईल.