सुहास शिरवळकरांचे ‘अस्तित्व’ पुन्हा बहरणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक म्हणजे सुहास शिरवळकर. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन 20 वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड अजूनही कायम आहे. आजही ते मराठीतील सर्वाधिक वाचले जाणारे तसेच ऐकले जाणारे लेखक आहेत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. शिरवळकरांच्या अमृतजयंतीच्या निमित्ताने त्यांची ‘अस्तित्व’ ही अप्रकाशित कादंबरी प्रकाशित होणार आहे. शिरवळकरांच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी असेल.

सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, ‘स्टोरीटेल‘च्या वतीने राज्यात कादंबरी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत  रवींद्र भयवाल लिखित ‘मिशन गोल्डन पॅटस‘ ही कादंबरी विजेती ठरली. ही कादंबरी तसेच, शिरवळकर लिखित ‘अस्तित्व’ ही अप्रकाशित कादंबरी याच कार्यक्रमात ‘स्टोरीटेल‘च्या माध्यमातून ऑडिओ स्वरुपात प्रकाशित होणार आहे. पुण्यात 27 नोव्हेंबर रोजी प्रकशन समारंभ होईल.

कादंबरी लेखन स्पर्धेत ‘मिशन गोल्डन कॅटर्स‘ साहित्यकृती विजेती ठरली. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील लेखकांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हृषिकेश गुप्ते व संजय सोनवणी, स्टोरीटेलयोगेश दशरथ, सुहास शिरवळकरांच्या साहित्याचे अभ्यासक अजिंक्य विश्वास व सुधांशू अंबिये यांनी काम पाहिले.