पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्रास दिल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या

पैशांच्या देवाणघेवाणीवरून चौघाजणांनी मानसिक त्रास दिल्यामुळे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जयंत लालुसिंग राजपूत (54) असे आत्महत्या या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 28 ऑक्टोबर 2020 मध्ये डेक्कन परिसरातील कांचनगंगा गल्लीतील चैतन्य अपार्टमेंटमध्ये घडली होती.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र मारणे, विवेक वायसे, बापू मोरे, बापूराव पवार यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीता राजपूत यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत आणि आरोपी यांच्यात पैशांची देवाणघेवाण झाली होती. त्यानंतर चारही आरोपींनी जयंत यांना पैशांमुळे मानसिक त्रास दिला.

त्यामुळे 28 ऑक्टोबर 2020 मध्ये जयंत यांनी कांचन गल्लीतील आयुरमान नॅचरल हेल्थ केअर कार्यालयात गळफास घेउन आत्महत्या केली होती. याप्रकरणी फिर्यादी महिलेने उशीरा तक्रार नोंदवल्यामुळे गुन्हा उशिरा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या