
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीय ब्राह्मण असतात, असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयामध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आलेला असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा कोरोगावची दंगल असो. दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीय ब्राह्मणच असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे प्रभावित होऊन दंगलीमध्ये जे उतरतात ती बहुजन मुलं असतात, असे सुजात आंबेडकर म्हणाले. तसेच दंगल पेटवायची असेल आणि हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर राज ठाकरे यांनी आधी आपल्या मुलाला रस्त्यावर उतरवावे, असेही ते म्हणाले.

























































